Author Topic: प्रेम  (Read 3968 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
प्रेम
« on: November 21, 2011, 01:01:40 PM »
प्रेम,   
नुसता शब्द उच्चारला तरी डोळ्या पुढे उभे रहातात
एक तरुण आणि एक तरुणी.....
कॉलेजला जाणारी, चोरून एकमेकांना भेटणारी.
डोळ्या पुढे येतो
पडणारा पाऊस, एखादी एकांतातली जागा.
मनातली हुरहूर.
 
प्रेमात पडलेल्या त्याला, सगळी कडे तीच  दिसते.
आरशातून  सारखी ती त्याच्या कडे बघते.
मित्र त्याला नकोसे वाटतात, एकटाच असतो तो.
मनातल्या मनात सगळ काही तिलाच सांगतो तो.

तिचीही परिस्थिती काही वेगळी नसते.
तिचीही परिस्थिती काही वेगळी नसते
मैत्रिणींशी तीही तशी फटकुनच रहाते
साडी नेसते तेंव्हा त्यानीच बघावस वाटत.
आरश्यात बघून गजरा घालताना तो मागेच तर असतो.

प्रेमात पडल्यावर पाऊस हवाहवासा वाटतो
दोघांशिवाय जगात कोणीच नसावस वाटत
भेटल्यावर दोघही बोलतात  एकमेकान बद्दलच
जगात कारण दुसर कोणीच तर नसत.

झाल कधी भांडण तरी ते मिटावस  वाटत
दोघांनाही एकमेकांना जास्तच भेटवस वाटत
भांडण तर फक्त निमित्त असत
दोघानाही एकमेकां शिवाय जमायचं नसत.

कधी आधी प्रेम जमत आणि नंतर लग्न होत
कधी आधी लग्न होत अन नंतर प्रेम जमत
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
तरी सुध्धा प्रत्येकाच ते वेगळच असत.

प्रेमात काही घ्यायचं नसत
दुसर्याला सर्वस्व द्यायचं असत
आधी आपल मन अन मग
स्वताःच असणच हरवायचं असत.

ह्या हरवण्यातहि एक जगण असत
तिच्या साठी स्वतःला बदलायचं असत
बदलत बदलत आणि एक दिवस
आपणच ती व्हायचं असत.  
     

 
केदार...

Marathi Kavita : मराठी कविता

प्रेम
« on: November 21, 2011, 01:01:40 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline काव्यमन

 • Newbie
 • *
 • Posts: 43
Re: प्रेम
« Reply #1 on: November 22, 2011, 11:46:22 AM »
ते वयचं वेढं असतं। छान..........

Offline dwahulearmy

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: प्रेम
« Reply #2 on: November 22, 2011, 02:58:01 PM »
GOOD POEM

Offline Priyanka Jadhav

 • Newbie
 • *
 • Posts: 35
 • Gender: Female
 • माझ्या कवितांचे प्रेर्णास्तान, तूच!
Re: प्रेम
« Reply #3 on: November 23, 2011, 04:09:07 PM »
mastach

प्रेमात काही घ्यायचं नसत
दुसर्याला सर्वस्व द्यायचं असत
आधी आपल मन अन मग
स्वताःच असणच हरवायचं असत

Chaan lines aahet !!  :)

Offline supriya joshi

 • Newbie
 • *
 • Posts: 14
 • Gender: Female
Re: प्रेम
« Reply #4 on: November 27, 2011, 09:39:25 PM »
« Last Edit: November 27, 2011, 09:40:42 PM by supriya joshi »

Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
Re: प्रेम
« Reply #5 on: November 28, 2011, 11:39:37 AM »
अप्रतिम..... जबरदस्त......

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):