खळखळत्या हस्यात तुझ्या गुंतलोय ग मी
काळ्या डोळ्यांत तुझ्या बुडलोय ग मी
सतत बोलतेस मी मात्र तुझ्यात गुंततो
काय बोलतेस माहित नाही पण बोलत राहा हेच मांगतो
मागून येतेस अलगद पण चाहूल आधीच ओळखतो
डोळ्यांवर हात ठेवण्यापूर्वीच डोळे बंद करून घेतो
ओळख पाहू म्हटल्यावर दुसरेच नाव घेतो
रुसलेल्या छटा मनात साठवून " अरे तु" म्हणून तुझीच फिरकी घेतो
पण आज न ते खळखळते हस्य
न ते काळे डोळे
न तुझी चाहूल न तुझा आवाज
न तुझा सहवास
वाटे तु होतीस हाच होता भास आणि फक्त आभास
--संध्या पगारे