त्याला समजत कस नही मला किती त्रास होतो
जेव्हा तो असा कडक माझ्याशी वागतो
फक्त त्याला हवं तस वागाव
बोलेल तस करावं
प्रेम फक्त मीच करणार
आणि हा माझ्यावर हुकुम गाजवणार
प्रेमळ सहवासाची आज उद्या वाट पाहते आहे
कधीतरी काहीतरी त्याला हि जाणवेल हेच मांगते आहे
हे मला माहित आहे कधीतरी तुला ही जाणवेल
मी नसताना माझ्या आठवणीत तुझे ही डोळे पाणवेल
आता तर मला हि माझ मनाला बदलाव लागणार
आठवणीत तुला ठेवून धर्मानेच वागणार
जरी पुन्हा कधीच तुला त्या भावना दिसणार नाही
मनापासून स्वीकारणाऱ्या माणसाला ती कधीच विसरणार नाही
पण लक्षात ठेव स्त्री मन जितक प्रेमळ तितकच कठोर होईल
मन आज जितक तुझ होत तितकच ते उद्या परक होईल
संध्या पगारे