प्रेमाचं पावित्र्य
साजना रोज भेटीन तुला
प्रेमाच्या गोष्टी ऐकवीन तुला
विरहात ही प्रेम असतं
दूर राहूनी प्रेम करता येतं
संयम ठेव मनी
नको करू जास्त जवळी
स्पर्शाने प्रेम कोमजेल
प्रेमाचे रूप पालटेल
राहू दे आपल्यातील अंतर
मनाला करू दे मनाशी स्पर्श
डोळ्यांची भाषा डोळ्यांनी होऊ दे
साजना रोज भेटीन तुला
प्रेमाचं पावित्र्य जपू दे मला
-काव्यमन