खुप दिवसांनी विचारले तिला
एक जागा सांग जिथे या जन्मी जायचे तुला
काही वेळ विचार करून म्हणाली ती
आहे अशी एक जागा
जायचेय माला तिथे कधीतरी
आकाशात, सागरात
दर्याखोर्यात की आसमंतात
विचारले मी तिला
भावनांच्या वार्यावर उडायचे आहे
अनंताच्या सागरात डूम्बयाचे आहे
फ़क्त एकदा स्वतहाला विसरून थोड़े थाम्बयाचे आहे
श्वासांच्या गजरात हरावायाचे आहे
आठवनींच्या वनात हिण्डआयचे आहे
फ़क्त एकदा जगण्याला शोधायचे आहे
वासरासराखे मुक्त संचारायाचे आहे
दिनाचार्येच्या काट्यानना स्तब्ध करायचे आहे
फ़क्त एकदा रडताना हसायचे आहे
आहे का रे अशी कुठली जगा इथे
एकाच क्षण आयुष्यात ने मला तिथे
जवळ घेतले मिठीत मी तिला
क्षणात बदलला आसमंत सारा
माहीत नाही तीच का ही जागा
पण ओल्या नज़रान्नी अणि हसनारया ओठांनी दिला हाच इशारा