Author Topic: आणि हे सारं...सारं तुझ्या प्रेमाने  (Read 2220 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
एक अशी निळी सकाळ
होईल तुझ्या येण्याने
सळसळतील पाने अंगणातली
तुझ्या निखळ हसण्याने

पसरतील सोनेरी किरणे
येतील कवडसे दाराने
 आणि तेही दिपून जातील मग
तुझ्या लाख तेजाने

उमलतील फुले आडोशाची
पडतील सडे पारिजातकाचे
तू जाशील वेचायला
तर भिजवेल तो दवाने

मग मेघ गर्जून येतील
पुन्हा रानात बरसून जातील
वेडी लोकं म्हणतील
"ह्म्म्म आला पावसाळा.."
आता त्यांना कसे हे ठाऊक असणार
इथला मेघही लाजतो तुझ्या प्रेमाने

- रोहित
« Last Edit: December 06, 2011, 11:46:46 AM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Priyanka Jadhav

 • Newbie
 • *
 • Posts: 35
 • Gender: Female
 • माझ्या कवितांचे प्रेर्णास्तान, तूच!

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....

Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
Aha.... mast...  :)