विसरू नको रे आई बापाला
झिजवली त्यांनी काया ,
काया झीजवून तुझ्या शिरावर
धरली सुखाची छाया रे वेड्या
मिळणार नाही तुला
आई बापाची माया
विसरू नको रे आई बापाला
झिजवली त्यांनी काया ।। धृ ।।,
तुला मिळेल बंगला माडी
शेत-वाडी, मोटार गाडी
आई बाप मिळणार नाही
हि जाण राहू दे थोडी
म्हातारपणी त्या आई बापाला
लावशिल भिक मागाया
काया झीजवून तुझ्या शिरावर
धरली सुखाची छाया रे वेड्या
मिळणार नाही तुला, आई बापाची माया ।।१।।
तुला मिळेल बायका पोरं
गण गोत्र मित्र परिवार,
खर्चाने गुरफटलेला
हा मायेचा बाजार
जीवनामधली अमोल संधी
नको घालवू वाया
काया झीजवून तुझ्या शिरावर
धरली सुखाची छाया रे वेड्या
मिळणार नाही तुला, आई बापाची माया ।।२।।
आई बाप जिवंत असता
तू नाही केली सेवा
ते मेल्यावरती कश्याला
रे म्हणतोस देवा देवा
बुन्धी लाडूच्या पंक्ती बसवशी
नंतर तू जेवाया
काया झीजवून तुझ्या चीरावर
धरली सुखाची छाया रे वेड्या
मिळणार नाही तुला, आई बापाची माया ।।३।।
स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी
तू समजून उमजून वेड्या
होऊ नको अविचारी,
जीवना मधली अमोल संधी
नको रे घालू वाया
काया झीजवून तुझ्या शिरावर
धरली सुखाची छाया रे वेड्या
मिळणार नाही तुला, आई बापाची माया ।।४।।