Author Topic: सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवेते  (Read 9103 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवेते
शतजन्मीचे हो माझे नाते

हळव्या तुझिया करात देता
करांगुळी ही रुप गोजिरी
गोड शिरशिरी उरांत फुलता
स्पर्शाने जे मुग्ध बोलते

करकमळाच्या देठाभवती
झिम्मा खेळत प्रीत बिलवरी
दृष्ट लाजरी जरीकाठी ती
तुझ्या लोचने वळूनी बघते

आठवे पाऊल प्रीत मंदिरी
अर्धांगी मी सगुण साजिरी
मूर्त होता तुझ्या शरीरी
अद्वैताचे दैवत होते