कुणीतरी आहे ती ................
जि शब्दाविनाही माझे मन जाणणार
जगातले सर्वे सुख माझ्या दारात आणून टाकणार
कुणीतरी आहे ती ................
... जि कातरवेळी माझ्या मनास हळूच स्पर्शून जाईल
अन ओळख विचारताच नुसतीच हसून देईल
कुणीतरी आहे ती ................
जि स्वप्नांपालीकडील विश्व मला दाखवेल
आणी तिच्या विश्वात रमताना मला स्वताचाहि विसर पडेल
कुणीतरी आहे ती ................
जिच्याशिवाय सारे काही शून्य असेल
जिच्या सोबत सारे विश्वच स्वर्ग भासेल
कुणीतरी आहे ती ................
जिच्या असेल मला ध्यास
जिच्यासाठी जगण्याचा असेल माझा हव्यास
कुणीतरी आहे ती ................
जिच्या प्रेमात मी असा एकरूप होणार
जसे नदीचे पाणी सागरात विर्घलणार
कुणीतरी आहे ती ................
जि माझ्या पासून दुरावणार तर नाही ना
माझ्या आनंदी विश्व ला संपवणार तर नाही ना
अशीच कुणीतरी त आहे ती ...............................
जिची मी आतुरतेने वाट बघतो आहे
पण माझ्या मनास का हि वेडी आशा छळते आहे ?
कुठे आहे हि ती कुणीतरी ? कशी आहे ती कुणीतरी?
कधी मिळणार मला हि माझी हि ती कुणीतरी ...
Author Unknown "but i have edited this somewhat to the best of my knowledge".