आयुष्यातलं सगळ्यात मोठ्ठ कोड ...
मला कधी प्रेम झालंच नाही ...
कदाचित झालं ही असेल...
पण कधी जाणवलं नाही ....
दहावी पर्यंत मुलांची शाळा
त्यात मराठी माध्यम...
वाह्यातपणा शिकण्यात गेलं
उमलणाऱ्या फुलाचं मन ...
महाविद्यालयात प्रेम भेटत..
दादा लोकांची भेटली शिकवण ...
पण दोन वर्ष निघून गेली ...
प्रेमाची झोळी फाटली चटकन..
अभियांत्रिकीच आयुष्य
असंच निघून गेलं....
चार वर्षाच्या काराकीर्दीत..
एक पाखरू ही नाही सापडलं ...
एकदा आवडली एक कळी...
होती फुलपाखरा सारखी नाजूक
पण पाहायची अशी
जणू ती होती खूप साजूक ...
मित्र म्हणायचे ..काय रे ?
एक ही नाही भेटली ...
त्यांना समजवायचो ....नाही रे
मलाच कोणी नाही आवडली...
आता त्यांना काय सांगाव
कधी कोणी बोललच नाही...
पहिल्यांदा आपण बोलायचं असत
माहित असूनही पाऊल पुढ पडल नाही ...
का बर या सर्व मुली
बाहेरच्या जगाला फसतात ...?
आणि फसवल गेलं कि...
मुलांचा उद्धार करत बसतात
आणि मुल तरी काय ?
दाखवणार स्वप्नांचा झरा
आणि पिऊन झालं अमृत कि
म्हणणार आता कुठही जाऊन मरा...
त्यापेक्षा ....
नकोच हे असल प्रेम ...
अन नको त्याच्या झळा...
का म्हणून उगाच ह्वाव
उन्हाळी माठातलं वाळा.....
महेश मनोहर कोरे
Modern college ऑफ Engg