वेळ असेल तुला तर
एकदा मला भेटशील का ?
दोन शब्द बोलायच होत
थोड ऐकून घेशील का
पहिली तू माझ्याशी
खुप काही बोलायची
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढायची
तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायची
नसेल विषय तरी
नविन विषय काढायची
काही ही बोलूंन
मला खुप खुप हसवायची
माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायची
दिवस भर माझ्याशी
कट्टी फू करायची
आता कशाला आमची गरज पडेल
अस सारख चिड...