लहानपणी भावंडात कुणाची तरी आपली विशॆष गट्टी असते. काही आठवणी या पुन्हा पुन्हा डोके वर काढत असतात. अशाच काही आठवणी
मी आणि तो
सारखेच दिसायचो
तो जरा खोडकर, बिनधास्त आणि उनाड
मी तसा लाजरा, स्वभावतःच बुजरा
शाळेत सारे आम्हाला फसत
राम और शाम म्हणून हसत
त्याच्या गंमती चालूच असत
माझ्या मात्र अंगाशी येत
त्याचा व्हायचा दंगा जोरदार
दुखावलेल्यांचा मार मी खाणार
चिंचा, आंबे हा पाडणार
रखवालदार मला ताणणार
वयात आल्यावर गोची झाली
अकस्मात कुणी विचारती झाली
काय विसरला का मला
अंगाचा कि हो थरकापच झाला
आठवते अजून एकच गीत
दोघांनी अवचित कितीदा गाणे
अस कस आमचे अजब ट्यूनिंग
कितीदा फक्त नजरेनेच बोलणे
आईला वाटे ,कसे होणार याचे
बंद करा म्हणे, सारे त्याचे धंदे
त्यावर त्याचे एकच उत्तर
हसायचे आणि सोडून द्यायचे
आज कधी कधी निवंत वेळी
आठवल्या त्या गाण्याच्या ओळी
काय गात होतास, त्याला विचारतो ,
तुलाच फोन लावतोय, तो उत्तरतो ..!!