कशे सांगू राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,
दिवसभर फक्त तुझ्या आटवणीनमध्येच मी रमलेला असतो.
वाट पाहत असताना,
वेळ जणू कासव होतो,
घड्याळ त्याच्या टिक टिक आवाजाने,
माझी छेड कडू पाहतो,
त्यांना ठाऊक असतेना,
मी तुझी वाट पाहत असतो.
कशे सांगू राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,
दर सेकंद, मिंट, तास मोजून काडतो,
तू सोबत नसताना हि,
तू सोबत असल्यासारखे,
तुझ्याशी गप्पा मारतो.
दिवस भराच्या माझ्या गमती जमती,
तुला सांगण्यासाठी साठून ठेवतो.
कशे सांगू राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,
खूपच जार आठवण आली,
तर घट डोळे मिटून,
माझ्या आठवणीतल्या तुला,
माझ्या पापण्यांचे परदे करून,
चलचित्र सारखे पाहतो.
पाहतो,
तुझे सारखे केसातून हात फिरवणे,
लाजेने डोळे खाली टाकून,
चेहेरा हाता आढ लपवणे,
आणि, हळूच मिश्कील हसणे.
असे तुझे सुंदर दृश्य पाहण्यात,
मी माझे मान रमव्तोह.
कशे सांगू राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,
जेव्हा तो क्षण;
तुझ्याशी बोलण्याचा,
जवळ येतो.
हृदय अति वेगाने धाऊ लागतोह,
मान प्रसंनचीत होतो,
मी एक विलक्षण आनंद अनुभवतो,
कारण काही क्षणात,
मी तुझ्याशी बोलणार असतोह.
अश्या दुराव्याने वाढलेलं माझ प्रेम,
मी तुला देणार असतो.
कशे सांगू राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,
दिवसभर फक्त तुझ्या आठवणीनमधेच मी रमलेला असतो.
-तुषार तू दळवी