Author Topic: आज ती हरुनही जिंकली होती...  (Read 1822 times)

Offline 8087060021

  • Jr. Member
  • **
  • Posts: 92
  • Gender: Male
आज ती हरुनही जिंकली होती...त्याच्या बेभान आवेगाच्या वर्षावातुन
ओसांडणारा
परमोच्च त्रुप्ततेचा एक स्वर्गीय स्पर्श,
तिच्या दमलेल्या श्वासातुन
ओघळून
तिच्या पापण्यांवर रेंगाळताना
तिला बेचिराख करुन गेला....

तिच्या कणाकणातुन झिरपणा-या
कस्तुरीगंधानं
आधिच निष्प्रभ झालेला तो,
तिच्या डोळ्यावर चढलेला बेपर्वा कॆफ पाहून
स्तिमितच झाला....

तिच्या हरण्यामुळे... आज तो जिंकुनही हरला होता...
त्याच्या जिंकण्यामुळे... आज ती हरुनही जिंकली होती...


-- Author Unknown
हि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.
« Last Edit: February 04, 2012, 11:48:51 AM by santoshi.world »