Author Topic: यालाच प्रेम म्हणायचं असत.  (Read 2160 times)

Offline 8087060021

  • Jr. Member
  • **
  • Posts: 92
  • Gender: Male
यालाच प्रेम म्हणायचं असत.

उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.

एकमेका  आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.

थोडस झुरण्याला
स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.

भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला
प्रेम म्हणायचं असत.

कितीही रागावल तरी
एकमेका सावरायला
प्रेम म्हणायचं असत.

शब्दातून बरसायला
स्पर्शाने धुंद होण्याला
प्रेम म्हणायचं असत.

 तुझ माझ अस न राहता
'आपल' म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत.-- Author Unknown


हि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.
« Last Edit: February 04, 2012, 11:42:01 AM by santoshi.world »