Author Topic: तिचा रुसवा .....  (Read 2226 times)

Offline salunke.monika

  • Newbie
  • *
  • Posts: 38
तिचा रुसवा .....
« on: January 06, 2012, 02:14:42 PM »
आज अचानक ती
माझ्या स्वप्नात आली,
थोडीसी उदास ,थोडीसी निराश
आणि हिरमुसलेली दिसली.....
एरवी बडबड करणारी ती
आज एकदम शांत होती,
कधी नव्हे ते अशांततेला
पडलेली जणू भ्रांत होती.....
मी समजलो
तिला राग आला होता,
पण कशाचा???
हा अजूनही यक्ष प्रश्नच होता....
विचारावे ठरवले तर
तिचा रोख माझ्याकडे होता,
आता मलाही वाटू लागले
दोष माझा तर नव्हता???
शेवटी न राहवून तीच मला म्हणाली
तू खूप बदलला आहेस,
पूर्वी रोज स्वप्नात यायचास
आता मला विसरला आहेस....
मला म्हणे कोण आहे ती
जिच्या विचारात एवढा रमतो आहे
नक्कीच तिचा आणि तुझा
काहीतरी मेळ जमतो आहे.....
पूर्वी एवढी बडबड करायचास
मला मनसोक्त हसवायचास,
मी थोडी रुसले कि
लगेच मला मनवायचास.....
आता रुसवे फुगवे काढायला
वेळच नाही तुझ्याकडे,
बोलायचे तर दूरच राहिले
साधा फिरकतही नाहीस माझ्याकडे......
तुम्हीच सांगा लोकहो
मी काय करू आता???
स्वप्नपरीही रुसली आहे
तिला मनवू कसे आता???
 (sandip)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
Re: तिचा रुसवा .....
« Reply #1 on: January 06, 2012, 02:41:27 PM »
AWESOME monika....instant fav kavita.. !!!!

Walkoli Gopichand

  • Guest
Re: तिचा रुसवा .....
« Reply #2 on: January 06, 2012, 07:16:22 PM »
Apratim kavita aahe !