Author Topic: आहे का कोण.............???  (Read 4238 times)

Offline salunke.monika

 • Newbie
 • *
 • Posts: 38
आहे का कोण.............???
« on: January 09, 2012, 12:52:17 PM »
वेड हे मन सतत
सैरवैर भिरभिरणार
विचारते मला
आहे का कोण तुला वेड लावणार ????
 
सतत तुझ्याच आठवणीत
गुंतून राहणार....
प्रत्येक गोष्टीत तुला
सामील करून घेणार .....
आहे का कोण तुला वेड लावणार ?????
 
सहवास तुझा मिळावा म्हणून
रोज नवीन बहाणा करणार ....
कधी चुकून नाही म्हंटले
तर रुसवा धरून भांडण करणार ....
आहे का कोण तुला वेड लावणार???
 
सुख आसो व दुखः
तुला कधी न विसरणार ....
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर
तुझा हात हातात धरून चालणार ...
आहे का कोण तुला वेड लावणार ????
 
नवनवीन स्वप्ने फक्त
तुझ्यासाठी रंगवणार ....
त्यात तू सामील व्हाव
आशी माफक अपेक्षा धरणार ...
आहे का कोण तुला वेड लावणार ????
 
खूप दिवसांनी भेटताना
तुझी आतुरतेने वाट पाहणार ....
क्षणाचाही विलंब न करता
तुला मिठीत घेणार.....
आहे का कोण तुला वेड लावणार ?????
 
उगाच ह्या न त्या कारणाने
तुझ्यावर रुसून बसणार ....
डोळ्यातून तुझ्या पाणी येता....
तुझीच प्रेमळ समजूत काढणार...
आहे का कोण तुला वेड लावणार ????
 
मायेची प्रेमाची उब जवळ आसताना
त्याच्या सहवासाचा गारवा देणार ....
जन्मदात्यांचीही आठवण न होवो
इतक निस्सीम प्रेम करणार ....
आहे का कोण तुला वेड लावणार ?????       मोनिका .....

Marathi Kavita : मराठी कविता


sameer pawar

 • Guest
Re: आहे का कोण.............???
« Reply #1 on: January 09, 2012, 01:51:37 PM »
Nice monika gr8 thoughts Like it :)

sameer pawar

 • Guest
Re: आहे का कोण.............???
« Reply #2 on: January 09, 2012, 01:52:17 PM »
Nice Monika Keep it up

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आहे का कोण.............???
« Reply #3 on: January 09, 2012, 03:40:29 PM »
khup chan....

Only "S"

 • Guest
Re: आहे का कोण.............???
« Reply #4 on: January 09, 2012, 03:43:09 PM »
Nice yar,

Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: आहे का कोण.............???
« Reply #5 on: January 09, 2012, 10:05:04 PM »
sundar ahe kavita...

sunanda

 • Guest
Re: आहे का कोण.............???
« Reply #6 on: January 10, 2012, 10:57:05 AM »
khup chaan

PARAG KADAM

 • Guest
Re: आहे का कोण.............???
« Reply #7 on: January 10, 2012, 04:14:06 PM »
khar sangu............ tar hi kavita ekdam.................. ba................ bagitlyavar vachali mag chan ahe  ekdam paha ani vacha........ kal.....llllllll.......

Offline Ram.potale

 • Newbie
 • *
 • Posts: 9
 • Gender: Male
Re: आहे का कोण.............???
« Reply #8 on: January 12, 2012, 01:50:37 AM »
khupch chhan..........

DIGHE YOGESH

 • Guest
Re: आहे का कोण.............???
« Reply #9 on: January 12, 2012, 10:59:55 AM »
मी तुला पाहिले तु मला पाहिले
मी तुला पाहिले तु मला पाहिले
गुंतली लोचणे भान ना राहिले
तु मला पाहिले मी तुला पाहिले
गुंतली लोचणे भान ना राहिले
गंध हा दरवळे जीव हा विरगळे
गंध हा दरवळे जीव हा विरगळे
आठवांचा मेघ हा पाजरे,
धरधर ती स्वरांतूनी गहीवर येई दाटून
मन हळवे मन हळवे फिरते कुढल्या धुदीत हे
तु मला पाहिले मी तुला पाहिले
गुंतली लोचणे भान ना राहिले
हा शहारा नवा हि शेशरी नवी
हा तुझा ध्यास की तुच तु भोवती
सरगम छेडतो जरी हरवुन मी तरी
मनातुन भास तुझे
मी तुला पाहिले तु मला पाहिले
मी तुला पाहिले तु मला पाहिले
--------------------योगेश ( मानव ) दिघे