Author Topic: तुझ्या एका शब्दासाठी  (Read 2901 times)

Offline killedar

  • Newbie
  • *
  • Posts: 8
तुझ्या एका शब्दासाठी
« on: January 11, 2012, 06:55:46 PM »


तुझ्या एका शब्दासाठी
वाट किती मी पहावी
तुझ्या एका शब्दामुळे
मला कविता सुचावी
माझी कविता अधुरी
तुझ्या एका शब्दाविना
जसा जीव चातकाचा
तडफडे थेंबाविना

तुझ्या शब्दाचे आभास
श्वासाश्वासात गुंतले
स्वप्नपाखरासवे मी
शब्दशिंपले गुंफले

तुझा शब्द येता कानी
देहभान हरपले
"काव्य झाले तनमन,"
माझे आभाळ बोलले!!!

-- Unknown

Marathi Kavita : मराठी कविता