Author Topic: क्षण झिम्मड ओलेते.......  (Read 932 times)

Offline bava1984

  • Newbie
  • *
  • Posts: 6
क्षण झिम्मड ओलेते.......
« on: January 25, 2012, 01:14:27 PM »
क्षण झिम्मड ओलेते.......

मन आठवणींच्या पानावरती
निथळत ओघळते 
क्षण झिम्मड ओलेते.......

बरसत्या घनाच्या पावसाळी
अशाच एका सांजवेळी
वीज चर्र कापते काळीज
अशी ती दिसते
क्षण झिम्मड ओलेते.......

पीसाटलेला थेंब जणू ही
श्वासातील रोम अणू ही
फूल गवती चूर चूर पावसात ही
तिज संगे सलगी पाहते
क्षण झिम्मड ओलेते.......

निसटत्या सुरांचे गाणे
का ह्रदय धडकत राहणे
का ओठचे हळहळणे
मुक्त मनाच्या रानी
भिजली नागीण सळसळते
क्षण झिम्मड ओलेते.......
          --भूषण भुवड् ९७७३०६७९३४

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: क्षण झिम्मड ओलेते.......
« Reply #1 on: January 25, 2012, 01:25:28 PM »
surekh kavita....