Author Topic: मृत्यू.........  (Read 3079 times)

Offline विवेक राजहंस...

  • Jr. Member
  • **
  • Posts: 72
  • ONLY RELIANCE
मृत्यू.........
« on: January 28, 2012, 01:02:19 PM »
तुमच्या माझ्या सभोवताली क्षणोक्षणी वावरतो मृत्यू ,
कधी स्फोटके , केव्हा गोळी ; कधी गळाही चिरतो मृत्यू...

तोंड ठेवले बंद तरीही घडायचे ते कधीना थांबे ,
देशच्या पोटात असा हा डोळ्यादेखत शिरतो मृत्यू

शोर्य -  धेर्य वीरांचे बघुनी मनात होतो खजील आणिक
नेता नेता धुरांधाराना अजरामरही करतो मृत्यू

नि:शास्त्रांचे तेज पाहुनी , ओंज पाहुनी तेही , खचतो
जरी वाटते आता जिंकला ; पण कायमचा हरतो मृत्यू

गरिबांच्या  मरण्याने " त्यांना " कोरडेच येतात हुंदके
नातलगांच्या डोळ्यामधून थेंब थेंब झरतो मृत्यू......

नातलगांच्या डोळ्यामधून थेंब थेंब झरतो मृत्यू......


विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५

Marathi Kavita : मराठी कविता


Bhau Patil

  • Guest
Re: मृत्यू.........
« Reply #1 on: January 30, 2012, 02:40:07 PM »
Khup Sundar................9113

mayur randive

  • Guest
Re: मृत्यू.........
« Reply #2 on: February 04, 2012, 04:39:03 PM »
mast,,,,,,,,,,,,,,,,