Author Topic: स्पर्श......  (Read 1910 times)

Offline विवेक राजहंस...

  • Jr. Member
  • **
  • Posts: 72
  • ONLY RELIANCE
स्पर्श......
« on: February 01, 2012, 05:04:36 PM »
स्पर्श......
तू ओळखावे मला तो हर्ष आज झाला...
तुझ्या मनाचा मला तो स्पर्श खास झाला ...

अजाण होते विसाव्याचे ठिकाण माझे .....
विरून गेल्या दिशा तो भास खास झाला...

इलाज आहे कुठे ....? गहीवारण्यास येथे...
निरोप माझा आता त्या आसवास झाला ...

तू घेऊन आलीस स्पर्श चांदण्यांचे....
अन चांदराती आठवणीचा प्रवास झाला....

निशब्द झालो आता मी प्रियेच्या समोर..
हवाहवासा असा तो आज त्रास झाला....

विवेक राजहंस, पुणे
९७६२०१८८३५ 
 

Marathi Kavita : मराठी कविता