Author Topic: खरी खरी साथ दे  (Read 6672 times)

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
खरी खरी साथ दे
« on: February 06, 2012, 11:26:58 AM »

खरी खरी साथ दे

(सर्व मित्रांना प्रेमळ विनंती)

आई-बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी
तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी ?

अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते
स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते

अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का ?
तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का ?

कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे
वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे

भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने
स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे

"साडी मस्त शोभतीये आज" मनमोकळी दाद दे
आठवणीने सुवासाचा कळीवाला गजरा दे

सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने
खमंग कणीस खातानाचा आनंद मनात टिपून घे

हॉटेलातील मेनू कधीतरी तिच्या चॉईसचा घेऊन दे
आईस्क्रीमची आवड सोडून तिच्याबरोबर कॉफी घे

मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे
वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे

वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे
पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे

झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे
जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे

हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे
नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे
अशी काहीशी साथ दे
मित्रत्वाचा हात दे............


- शशांक पुरंदरे.
« Last Edit: April 14, 2012, 10:05:09 AM by shashaank »

Marathi Kavita : मराठी कविता


NILESH SARVANKAR

 • Guest
Re: खरी खरी साथ दे (Valentine day special)
« Reply #1 on: February 06, 2012, 12:18:42 PM »
धरला तुझा हात
तुझ्या संगे चालण्यासाठी

दाखवला हक्क
तुझ्यावर मी
तु माझीचं आहेस हे
सांगण्यासाठीचं

जगाचे बंध झुगारुन
कधी माझ्यासाठी येत
जा

निदान तु मला
आवडतेस याचा विचार
करत जा

आहे वेडा तुझाच मी
तु ही वेड्यासारखी
वागत जा

माझं तुझं प्रेम
तु शब्दां मधुन मांडत
जा

जीवन हे तुचं सजवं
माझं
तु माझ्यासाठी सजत जा

जगाचे बंध झुगारुन
तु कधी माझ्यासाठी
येत जा

Happy Valetine Day

Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: खरी खरी साथ दे (Valentine day special)
« Reply #2 on: February 06, 2012, 01:39:20 PM »
khup chan kavita ahet...donhi

Offline p27sandhya

 • Jr. Member
 • **
 • Posts: 56
Re: खरी खरी साथ दे (Valentine day special)
« Reply #3 on: February 06, 2012, 02:21:15 PM »
SUNDAR KONATYAHI MULILA AVADELCH ASHI I LOVED IT

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: खरी खरी साथ दे (Valentine day special)
« Reply #4 on: February 08, 2012, 09:44:39 AM »
Thanks to all......

Offline UNREVEALED MYSTERY

 • Newbie
 • *
 • Posts: 43
Re: खरी खरी साथ दे (Valentine day special)
« Reply #5 on: February 08, 2012, 10:57:19 AM »
donhi kavita mast ahet..

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: खरी खरी साथ दे (Valentine day special)
« Reply #6 on: February 08, 2012, 11:01:47 AM »
donihi kavita surekh aahet...

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: खरी खरी साथ दे (Valentine day special)
« Reply #7 on: February 08, 2012, 02:41:13 PM »
Unrevealed mystery and Kedar - Thanks a lot.

Offline rohit21392

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: खरी खरी साथ दे
« Reply #8 on: September 25, 2013, 09:22:07 AM »
खुप छान कविता आहे मीत्रा .....!!!!!


Offline rajeshk125

 • Newbie
 • *
 • Posts: 8
Re: खरी खरी साथ दे
« Reply #9 on: September 28, 2013, 01:44:10 PM »
Khupach Mast :)