Author Topic: आजही मी तिथेच आहे...  (Read 2251 times)

आजही मी तिथेच आहे...
« on: February 13, 2012, 02:11:33 PM »
आजही मी तिथेच आहे...

ज्या रस्तावरून तू जात होतीस
अजूनही तो रस्ता इथेच आहे,
त्या रस्त्यावर वाट बघणारा
आजही मी तिथेच आहे...

तुझ्या कोमल पायांचा स्पर्श
आजही या मातीला सुखावत आहे,
तुझ्या एका नजरेने सुखावणारा
आजही मी तिथेच आहे...

शाळा सुटायच्या वेळी जी घंटा
वाजते आजही ती इथेच आहे,
शाळा सुटल्यावर तुला शोधणारा
आजही मी तिथेच आहे...

संगीताच्या वर्गाला जाणारी तुझी
साउली आजही इथेच आहे,
तुला जातांना न्याहाळणारा
आजही मी तिथेच आहे...

तासनतास तुझा विचार करणारा
आजही तो इथेच आहे,
वेळ मिळाला तर एकदा बघ
 आजही मी तिथेच आहे...

मरणारे तुझ्यावर लाख असतील
प्रेम करणारा तर एक आहे,
कधी एक हाक तर देऊन बघ
आजही मी तिथेच आहे...


: अविनाश सु.शेगोकार
१३-०२-२०१२
 

 
« Last Edit: February 13, 2012, 07:00:48 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline UNREVEALED MYSTERY

  • Newbie
  • *
  • Posts: 43
Re: आजही मी तिथेच आहे...
« Reply #1 on: February 13, 2012, 04:34:01 PM »
mast... bhau thod pudhe ja.. kadachit koni tari tumachi vat pahat asel pudhachya valnavar... dont mind.. pan kavita masatch ahe

Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
Re: आजही मी तिथेच आहे...
« Reply #2 on: February 13, 2012, 06:38:01 PM »
मरणारे तुझ्यावर लाख असतील
प्रेम करणारा तर एक आहे

chan :)

Re: आजही मी तिथेच आहे...
« Reply #3 on: February 17, 2012, 12:19:07 PM »
 :)   धन्यवाद !!!  :)