Author Topic: कित्येक वर्षानी..  (Read 1274 times)

Offline प्रसाद पासे

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
  • कवितेतून स्वतःला समजायला लागलो..
कित्येक वर्षानी..
« on: February 13, 2012, 04:57:46 PM »
कित्येक वर्षानी पाहतो आहे तुला
जशी होतीस तशीच दिसते आहे मला

कॉलेजमध्ये होतीस तेव्हा बोलायची नाही
मलाही तेव्हा बोलायाचे धाडस नाही

तुला घरी जाताना नेहमी पाहायचो मी
त्या खिड़कीतुन हळूच वाकून मी

केवळ तुझ्यासाठी कॉलेजला यायचो मी
आणि त्या रटाळ लेक्चरला बसायचो मी

तू हुशार कॉलेजमध्ये नेहमी नंबर एक
मी वेडा तुझ्यामध्ये, सारखा शेवटून एक

तुझी एकांकीकेची तालीम, ती डान्सची तयारी
तुझ्याशी बोलायची नाही करू शकलो मनाची तयारी

ते दिवस कसे गेले काही कळलेच नाही
त्यावेळेस मी संधीचा फायदा घेतलाच नाही

तेव्हा केली चुक पण आता करणार नाही
हा मिळालेला क्षण मी सोडणार नाही

मला तुला काही सांगायचे आहे
मनातले दोन शब्द बोलायचे आहे   

प्रसाद पासे

Marathi Kavita : मराठी कविता