Author Topic: प्रश्न  (Read 1931 times)

Offline umesh kothikar

 • Newbie
 • *
 • Posts: 32
प्रश्न
« on: February 24, 2012, 10:00:46 AM »
तुझ्या स्मृतींतील तुला नको ते
मला नेमके देशील का?
मौनाआधी फक्त एकदा
ओठांवरती येशील का?

प्रतिबिंबातून बिंब तुझे तू
डोळ्यांमधले घेशील का?
हृदय बिचारे तसेच ठेवून
फक्त चेतना नेशील का?

स्पर्शामधली विसरून ओळख
अबोध होउन हसशील का?
जेथ उमटली खूण तुझ्यावर
माझी, आता पुसशील का?

मलाच वगळून जगण्यासाठी
स्वतः तरी तू पुरशील का?
मी गेल्यावर आयुष्यातून
सांग तुझी तू उरशील का?


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रश्न
« Reply #1 on: February 24, 2012, 11:08:08 AM »
hi tar sundar gazal aahe.... khup chan.

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: प्रश्न
« Reply #2 on: February 25, 2012, 10:59:28 AM »
मी गेल्यावर आयुष्यातून
सांग तुझी तू उरशील का? - kyaa baat hai....

suresh naik

 • Guest
Re: प्रश्न
« Reply #3 on: March 07, 2012, 02:55:43 PM »
nice yaar.....

sia

 • Guest
Re: प्रश्न
« Reply #4 on: March 08, 2012, 03:52:29 PM »
khup khup sundar kavita ahe..nehmi vachavi v athvanit rahil ashi kavita ahe