Author Topic: माझंही मुकंप्रेम...  (Read 1859 times)

माझंही मुकंप्रेम...
« on: February 26, 2012, 12:49:36 AM »
काय पाहतोस रे माझ्या कडे असा
सारखा सारखा...
वाटते भूतलावर पडताहेत
नभीच्या तारका
खरं सांगू , मलाही आवडतात त्या तुझ्या
चोरट्या नजरा
एकच तर असतो बहाणा केसात
माळण्याचा गजरा....

त्या दिवशी थांबले होते
पाहताच तुला
पाठवून मुद्दामच समोर
मैत्रिणीला
दोघात आपल्या उगाच चालला होता
नजरेचा चाळा
पण बोलण्याचा धीर
होईना कुणाला

मी पण तुझ्यासाठीच
झुरते
सभोवती तुझ्या ना गरज
कुणाची उरते
कधीच भरेना मन तुला
पाहून पुरते
बोटे केसांसोबत आणि मन तव
समवेत झुलते 

तुला स्पर्श झाला त्या दिवशी
नकळत...
रोमारोमात दामिनी गेली
पळत
तुही अंग चोरलस मागे
वळत...
मज मनगंगा मिळाली सागरा
खळखळत...

वहीत नाहीतर मनातही कोरले
तुझे नाव
मैत्रिणीनाही अचूक कळला माझ्या
मनातला भाव
आता एकदा तरी घेवून माझ्या
ह्रीदायाचा ठाव
सजवशील का रे माझ्या मनातले
एकटे गाव

आता किती रे घालू
मनाला आवर
फक्त एकदाच कर माझी पुरी
इच्छा अनावर
विरू दे हि काय तुझ्या
मिठीत मनभर
अन तुझी साथ मिलो मला
शत जन्मभर

                                             ......अनुराग     
                                         shabdmuke.blogspot.in

Marathi Kavita : मराठी कविता