Author Topic: तू  (Read 2024 times)

Offline umesh kothikar

  • Newbie
  • *
  • Posts: 32
तू
« on: March 02, 2012, 08:55:58 AM »
तू,
तू माझ्या पापण्यांवर पांघरलेले
स्वर्गीय स्वप्न,
तू माझी रात्र भिजलेली आणि
तूच माझी ऋतूस्नात पहाट, गुलाबी
तूच माझी नाळ आणि
तूच माझा जन्म आणि
पहिला शब्दही
तूच प्रकाश आयुष्यातील शुभ्रतेपल्याड
आणि तूच काळोख माझा मखमली
एकांत बनून स्वप्नांसाठी
तुझ्याच
तूच मांडी; नितळ, मृत्यूपेक्षाही उबदार
चिरंतन विसावा
आणि तू, सावली नाहीस माझी
तर, तू आहेस
मला सावली देणारं हजार हातांचं झाड
तू मिठी, भरगच्च
आतुर समुद्रासारखी आणि
तूच विद्युल्लता, रक्तामधली
तूच चेतवणारी
तू कोण आहेस?
तू आहेस उत्तर, थकलेल्या
माझ्या आयुष्याच्या प्रश्नाचे
तू मोक्ष, तू मुक्ती
तरीही चक्र, जन्मांचे...तोपर्यंत
समान धागा तुझ्यामाझ्यातला
एकमेकांसाठी
तू आहेस जमीन, मला जन्म देणारी
आणि तूच आहेस
पाऊस
माझ्या त्वचेआडचा बरसणारा
तू जन्मदात्री, मृदगंधाची
आणि तूच
माझ्या डोळ्यांतल्या दवाचे ओठ
तू शरीर, तू प्राण
तूच आत्मा आणि तूच
कोंदण अशरीरी, दोघांचे
एकच
तू श्वास माझे, तुझे
आणि तूच
श्वासांचे बोट धरून अलगद
माझ्या ओठांवर विसावणारा
माझा नि:श्वास
तू ये आणि
मुक्त कर बंधनातून
या समुद्राला मर्यादेच्या
सांडून अश्रू दाटलेले; किनार्‍याचे.... कुठेतरी
निदान पोहचू दे ओंजळभर
माझ्या तृषार्त ओठांपर्यंत; अन
मिसळू दे मला तुझ्यात..
जन्म जन्म
जन्म जन्म..Marathi Kavita : मराठी कविता


yogesh gawade

  • Guest
Re: तू
« Reply #1 on: March 02, 2012, 10:02:53 AM »
love  poem