Author Topic: माझी गाणी: लटिका राग  (Read 836 times)

Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
माझी गाणी: लटिका राग
« on: March 04, 2012, 07:46:03 PM »
लटिका राग

प्रिये फुलली हि वाटिका
सुंदर हि घटिका
दूर उभी राहुनी
अबोल तू अशी का

नुकतीच बरसली श्रावणसर
सोनेरी उन्हे पसरली भूवर
फुलांवर पानांवर मनावर
सुगंधात मृत्तिका

तुझ्यासवे कसे बोलावे
ह्या रागाला काय म्हणावे
का असे रोखुनी बघावे
फुगवुनी नासिका

फुल डोलते वाऱ्यासंगे
भ्रमारासावे प्रणय रंगे
प्रीतीच्या गुजगोष्टीत दंगे
तरुसवे लतिका

किती वेळ राहणार अजुनी
तळहाती हनुवटी ठेवुनी
मधेच हसते ओठ दाबुनी
सोड राग हा लटिका

---प्रसाद शुक्ल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline raghav.shastri

 • Jr. Member
 • **
 • Posts: 62
 • Gender: Male
Re: माझी गाणी: लटिका राग
« Reply #1 on: March 04, 2012, 09:13:14 PM »
तुझ्यासवे कसे बोलावे
ह्या रागाला काय म्हणावे...
का असे रोखुनी बघावे
फुगवुनी नासिका...


किती वेळ राहणार अजुनी
तळहाती हनुवटी ठेवुनी...
मधेच हसते ओठ दाबुनी
सोड राग हा लटिका...

छान... मस्तच आहे....
पण एखाद्या फोटोसोबत पोस्ट कर म्‍हणजे कवितेला वाचायला आनंद आणखी मिळेल...

Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
Re: माझी गाणी: लटिका राग
« Reply #2 on: March 05, 2012, 09:29:04 AM »
Hi Raghav
thanks for your comment to my post
Mi just recently hi site join keli .
ata fakta kavita post kasha karayachya te shikalo ahe
you said - i can add photo
how it can be done?
I work in non IT area ( work as a scientist) so not much aware of page designing
your help would be appreciated
dhayawad n cheers
prasad
prasadshukla26@gmail.com

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझी गाणी: लटिका राग
« Reply #3 on: March 05, 2012, 10:46:54 AM »
khup sundar kavita....