Author Topic: स्वप्न पाहिली आकाशाची  (Read 1071 times)

स्वप्न पाहिली आकाशाची
« on: March 06, 2012, 04:54:55 PM »
स्वप्न पाहिली आकाशाची
भूमीच आली हाती
समजत नाही हे जीवन
आपण जगतोय कशासाठी?

मनाला जेव्हा शुद्ध आली
तेव्हा सापडली वाट
वाट कसली हो ती
जिला नाही कोणताच माप

ठरवलय मी आता
असच चालत रहायच
वाटेत आलेले दगड सोडून
प्रवाहा बरोबर वहायच

पहायचय हे जीवन
आपणास न्हेत तरी कुठे
मिळेल का एखादा विसावा
या पोळलेल्या मनास जिथे? :)

Marathi Kavita : मराठी कविता