Author Topic: माझी गाणी : तुझ्या सहवासात  (Read 1263 times)

Offline prasad26

  • Jr. Member
  • **
  • Posts: 103

प्रिये तू जाऊ नकोस दूर
वाटेल हुरहूर तुझ्या विरहाची
तुजविन नाही मज
येणार नीज तळमळ होईल रातीची

तुझ्या निळ्या निळ्या नयनात
पाहता त्या ऐन्यात मीच ग मला
विसरुनी जाते देहभान, जगाची नच जाण
खरच सांगतो तुला

हाती घेता तुझा ग हात
माझ्या अंगात उठती धुंद लहरी
ओठ गुलाबी ते चुंबिता प्यावे जसे अमृता
वाटते ग सुंदरी

केसांमध्ये माळता मोगरा
आणखीच होई साजरा एक चेहरा लाजरा
थोडा लटका तो बावरा जणू ती अप्सरा
आली या भूवरा

लाडे लाडे एक खुले कळी
नाक ते चाफेकळी उडवी पाहुनी मजकडे
मग हसू येई मनात गुलाबी गालात
गोड खळी पडे

रुपेरी चांदण्यात माझ्या बाहूत
जेंव्हा तू शिरसी
एक आगळ्या धुंदीत वेगळ्या विश्वात
नेसी तू मजसी

असता तुझी ग साथ
केंव्हा सरे रात मज न कळे
लाल होई पूर्वेवर तुझ्या हि गालावर
रक्तमा खेळे

---प्रसाद शुक्ल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Very Nice Poem Prasad.............केसांमध्ये माळता मोगरा
आणखीच होई साजरा एक चेहरा लाजरा
थोडा लटका तो बावरा जणू ती अप्सरा
आली या भूवरा
 :)