Author Topic: मनातल्या मनात  (Read 2162 times)

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
मनातल्या मनात
« on: March 27, 2012, 11:23:03 AM »
मनातल्या मनात
मनात माझ्या तुझीच आठवण
मनात माझ्या तुझीच वाट
मनातच आहे सगळं काही
मनात माझ्या तुझे विचार दाट


सामावून मी ठेवलंय सगळंच
ह्रिदयाच्या आतल्या आत
कसं सांगू ग सजनी
तू आहेस मनातल्या मनात


शांत तुझा स्वभाव
निरागस तुझे डोळे
स्वप्नं सुंदरी तू माझी
पण विचार तुझे भोळे


पहावी सजून तुला
माझ्या घराच्या अंगणात
कसं सांगू ग सजनी
तू आहेस मनातल्या मनात


कवी - कल्पेश देवरे   Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: मनातल्या मनात
« Reply #1 on: March 27, 2012, 06:34:03 PM »
sundar

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
Re: मनातल्या मनात
« Reply #2 on: March 27, 2012, 07:00:32 PM »
Thank U!