Author Topic: माझी ताई....तारणारा ईश्वर  (Read 1655 times)

Offline www.facebook.com/freemarathisms

  • Newbie
  • *
  • Posts: 23
  • Gender: Male
  • जीवन खूप सुंदर आहे
    • free marathi sms alert
 :-X :) :) :) :)
माझी माता ,माझी आई,
जिला मी म्हणतो "ताई"

आई म्हणजे आत्मा ईश्वर,
माझी ताई म्हणजे,
संकटकाळी तारणारा ईश्वर ||द्रू||


जेव्हा जेव्हा पडली ,
माझ्यावर दुष्ट सावली ,

माझा बचाव करण्या,
ती वेळोवेळी धावली,

रोज मी तिचे,
गुण-गान गातो मन-राऊळी,

तीच माझी माउली ,तीच माझा सर्वेश्वर
ताई म्हणजे
संकटकाळी तारणारा ईश्वर ||१||
 
सदैव माझ्या पाठीशी उभे राहून ,
पुरा केला माझा आट्हास,

शिकवले तिने मला हास्यातून ,
कसे दूर करावे दु:खास,

जीवनात प्रत्येकाला,
कसा द्यावा आनंदाचा सुवास

तुझी सेवा केल मी आयुष्यभर,
ताई म्हणजे,
संकटकाळी तारणारा ईश्वर||२||
 :) :)-अतुल
.....एक मराठ-मोळ फुल