Author Topic: तिला मला सोबत घेऊन  (Read 1810 times)

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
तिला मला सोबत घेऊन
« on: March 27, 2012, 07:15:05 PM »

तिला मला सोबत घेऊन 
पाऊस पडत होता


ढग दाटून आल्यावर
तीचं माझं भेटण
वाऱ्याच्या त्या झुळूक सोबत
तीचं माझ्यावर रागावनं
तू उशिरा का आलास ?
असे म्हणून तीचं चिडणं
तिला मानाव्ण्यासाठी
मग माझे विनोद सांगणं


हा सगळा प्रकार पाहून
निसर्ग हसत होता
तिला मला सोबत घेऊन
पाऊस पडत होता


ती भिजलेली असतांना
माझं हसून तिच्याकडे पाहणं
मला हसतांना पाहून
तिचं पुन्हा माझ्यावर चिडणं
मग तिचा हात हातात घेऊन
माझं हॉटेलात शिरणं
प्रेमळ अशा नजरेने पाहून
मनातला सगळं सांगणं


असला हा स्वभाव माझा
तिला खूप आवडत होता
तिला मला सोबत घेऊन
पाऊस पडत होता


कवी - कल्पेश देवरे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तिला मला सोबत घेऊन
« Reply #1 on: March 28, 2012, 06:17:09 PM »
chan...

Offline Kalpesh Deore

 • Jr. Member
 • **
 • Posts: 88
 • Gender: Male
Re: तिला मला सोबत घेऊन
« Reply #2 on: March 29, 2012, 04:31:51 PM »
धन्यवाद.....! :)