Author Topic: माझी गाणी : प्रेम प्रेम प्रेम  (Read 1060 times)

Offline prasad26

  • Jr. Member
  • **
  • Posts: 103
प्रेम प्रेम प्रेम

प्रेम प्रेम प्रेम
काय ही गोष्ट असे
अनुभवा वाचुनी
ते काही कळणार नसे

प्रेम प्रेम प्रेम
बघून नाही दिसणार
ऐकावे म्हणावे तरी
श्रुतीला ना  भावणार

प्रेम प्रेम प्रेम
जिव्हेवरी चाखता न येई
गंध त्याचा नासिकेत
हुंगता जाणार नाही

प्रेम प्रेम प्रेम
कसा करणार त्यास स्पर्श
फुलवता फुलणार नाही
रोमांचाचा मनात हर्ष

प्रेम देऊ म्हटले तरी
मनासारखा घेणारा पाहिजे
प्रेम घेऊ म्हटले तरी
मनासारखा देणारा पाहिजे

घेणे-देणे वा देणे-घेणे
परिणाम ह्याचा जी अनुभूती
प्रेम बसणे प्रेम होणे प्रेम करणे
जमुनी ह्या येतात कृती

ह्या कृतींचे उद्दीपन
पेमिक फक्त जाणतील
प्रेमाचे अस्तित्व प्रेमाने
पंचेन्द्रीयांनी भोगतील

प्रेम प्रेम प्रेम
उमजणार नाही वाचून
एकदातरी उधळा ते
नका मनात ठेवू साचून

--प्रसाद शुक्ल