Author Topic: ती फक्त तुझीच राहील  (Read 1787 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
ती फक्त तुझीच राहील
« on: April 12, 2012, 11:21:42 AM »
सर्व प्रेमपत्रे देऊन गेली
सर्व आठवणी विसर म्हणाली
परत नाही येणार कधीच, जाते म्हणाली
सखी हृदय मात्र परत द्यायची विसरली.

ती असं का वागली?
ती असं का बोलली?
तिच्या हृदयाने मग माझी
असी समजूत काढली.

"ती तुला नाही विसरली
तुझ हृदय घेऊन ती गेली
मला तुझ्याजवळ सोडून गेली
पहिल्या प्रेमाची निशाणी ठेऊन गेली.

ती पुन्हा परत येईल
तुझा हृदय तिला घेऊन येईल
प्रेमाचा वर्षाव पुन्हा होईल
ती फक्त तुझीच राहील
ती फक्त तुझीच राहील ."


visit my blog at www.prashu-mypoems.blogspot.com
« Last Edit: April 12, 2012, 11:23:00 AM by prashuN »

Marathi Kavita : मराठी कविता