Author Topic: प्रेमात पडलो...  (Read 1549 times)

Offline Sourabh Gudpalli

 • Newbie
 • *
 • Posts: 8
 • Gender: Male
 • सौरभ गुडपल्ली
प्रेमात पडलो...
« on: April 13, 2012, 09:04:26 PM »
त्या दिवशी मी,
प्रेमात पडलो,
बरंच लागलं,
पण रक्त …
जखम वगैरे काही नाही दिसलं….
तिने हसून माझ्याकडे पाहिलं,
आणि मी तिच्या डोळ्यातच हरउन गेलो …
तिच्या काळ्या काळ्या केसांत….
मी स्वतः ला गुंतून बसलो ….
तेव्हा पासून मला Newton’s Law ,
चुकीचा वाटायला लागला..
force of Gravity चा law लिहिताना,
तो थोडासा चुकला ….
Apple झाडावरून सरळ….
जमिनीवरच पडलं,
पण प्रेमात पडल्यापासून….
मला हवेत असल्या सारखं वाटायला लागलं….
रात्रीच्या स्वप्नात…
तिला पाहिलंच …
पण दिवस भर उघड्या डोळ्यात,
तिचंच स्वप्नं दिसत राहिलं …
आज-काल मला पावसात भिजावंसं वाटतं …
जुहू चौपाटी च्या वाळूवार चालावंसं वाटतं,
Bandstand वर तिच्या सोबत बसावंसं वाटतं …
Hiranandani Gardens मधेय फिरावंसं वाटतं …
त्या दिवसापासून मला ….
“कुछ कुछ होता है” वगैरे वाटयाला लागलंय ….
त्यात अजून काय तर ….
मला “दिल तो पागल है” सारखं गाणं पण
आवडायला लागलंय ….
तेव्हापासून माझं मन “Rocky ” मधल्या संजय दत्त सारखं …
तिच्या शिवाय कुठेपण लागत नाही आणि वेळ पण जात नाही …
मी “मोहब्बते” मधल्या जिम्मी शेरगिल सारखा …
चालता चालता थांबतो … तर बसल्या बसल्या कुठेतरी हरउन जातो …
tweeter वर पण आज-काल मी फक्त …
“Love Quotes”च tweet करतो….
माझा Facebook वरचा status पण …
असाच काहीतरी असतो ….
दिवसा गुलाबी ढगांत ….
लाल लाल सूर्य मला भासतो ….
तर रात्री … रंग बिरंगी .. तारे आणि चंद्रा सोबत ….
तिचाच चेहरा मला दिसतो …
प्रेमात पडल्यापासून मी ….
जरा विचित्रच वागायला लागलोय….
गप्पं गप्पं बसायला लागलोय ….
पण मनातल्या मनात …
वादळांना सामोरे जायला लागलोय ….

सौरभ गुडपल्ली

Marathi Kavita : मराठी कविता

प्रेमात पडलो...
« on: April 13, 2012, 09:04:26 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: प्रेमात पडलो...
« Reply #1 on: April 14, 2012, 12:47:59 AM »
yoooo..........saurabh. khup chan kavita. :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):