Author Topic: प्रेमाच्या शोधात . . .  (Read 3159 times)

Offline Deepak Pardhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
 • Deepak Pardhe
प्रेमाच्या शोधात . . .
« on: April 24, 2012, 01:27:42 AM »

आयुष्याच्या ह्या वळणावर,
काही असच घडत असतं,
असावी आपली हि प्रेयसी,
मनाला सतत वाटत असतं . . .

कोण असेल ती, कशी असेल ती,
शंभर प्रश्न उभे राहतात,
प्रत्येक सुंदर चेहऱ्याच्या आड,
मग तिलाच शोधू लागतात . . .

मग अशीच होते कोणाशी तरी भेट,
सुंदर मुलगी असते समोर, भिडते नजर थेट,
मैत्रीचा प्रवास असा काही सुरु होतो,
तिच्यातच स्वप्नं सुंदरी शोधण्याचा कार्यक्रम चालू होतो . . .

काही नाती जुळतात,
तर काहींचा नसतो नेम,
प्रेम पण जाते आणि मैत्री पण तुटते,
काहींच्या नशिबाचा असतो वेगळाच गेम . . .

पण हे वयच असे असते,
कि पाऊलेच थांबत नाहीत,
तिला शोधण्याच्या शर्यतीत,
रोमियो काही थकत नाहीत . .  .

म्हणून तर म्हणतात मित्रांनो . . .
"अरे एक मुमताज गयी तो क्या फरक पडता हे"
"क्या कोई मजनू भी कभी अकेला मरता हे" 

- दीपक पारधे

(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी, माझ्या ब्लोग्स ना भेट दया : http://deepakpardhe.blogspot.in/ आणि फेसबुकवर मला join करा . . .  )

Marathi Kavita : मराठी कविता


Offline balrambhosle

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
Re: प्रेमाच्या शोधात . . .
« Reply #1 on: April 24, 2012, 06:28:01 AM »
 :) :) :) :) :)tu khup chan lihitos re khup ras aasto kavitet. ankhi lihi khup lihi.

Offline Deepak Pardhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
 • Deepak Pardhe
Re: प्रेमाच्या शोधात . . .
« Reply #2 on: April 24, 2012, 10:12:45 AM »

Thanks Balram... He sagale tumha sagalyanchya Wishes mulech hote aahe re... Mi nehmi asech lihanyacha Prayatna karat rahil...  :)

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: प्रेमाच्या शोधात . . .
« Reply #3 on: April 24, 2012, 01:47:39 PM »
Chan  :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेमाच्या शोधात . . .
« Reply #4 on: April 25, 2012, 10:29:08 AM »
म्हणून तर म्हणतात मित्रांनो . . .
"अरे एक मुमताज गयी तो क्या फरक पडता हे"
"क्या कोई मजनू भी कभी अकेला मरता हे"
एक मुमताज nahi mili to kya
gam ko sath leke marta hai
 :D
 
just for fun.... pan kavita kharach awadli.
 

Offline Deepak Pardhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
 • Deepak Pardhe
Re: प्रेमाच्या शोधात . . .
« Reply #5 on: April 25, 2012, 12:10:57 PM »
Nice Kedar Saheb....

prachi AHIRE

 • Guest
Re: प्रेमाच्या शोधात . . .
« Reply #6 on: April 27, 2012, 09:42:16 AM »
Tumha pari amhalahi ek mumtaz havi...
amalahi amchi ek sonpari havi....



                                        KHARCH KHUP CHAN DIPAKJI

Offline Deepak Pardhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
 • Deepak Pardhe
Re: प्रेमाच्या शोधात . . .
« Reply #7 on: April 27, 2012, 10:17:56 AM »

Thanks Prachi... Thanks for commenting...

Ren

 • Guest
Re: प्रेमाच्या शोधात . . .
« Reply #8 on: April 27, 2012, 03:24:06 PM »
असं कोणी असेल तर किती बरे होईल...

डोळ्यात प्राण आणून ज्याची वाट पाहता येईल..
ज्याच्या एका नजरेसाठी मन आतुर होईल...
ज्याला फक्त पाहिल्यावर सगळा शिन जाईल...
असं कोणी असेल तर किती बरे होईल... 

ज्याच्या बोलण्यातून फक्त एकता येईल...
ज्याच्या हसंन्याने आपल्याला हसू येईल...
आपल्या दुःखात जो सहभागी होईल...
असं कोणी असेल तर किती बरे होईल...

हक्काने ज्याच्यावर रागावता येईल...
खांद्यावर डोके ठेवून त्याच्या सर्व काही सोपवता येईल...
मनातले तो न सांगताही ओळखु शकेल...
असं कोणी असेल तर किती बरे होईल...

ज्याच जगण फक्त आणि फक्त आपल्यासाठी असेल...
आणि आपल्या जीवनाचा तोच एक हेतू असेल...
निस्वार्थ मनाने जो आपल्यावर प्रेम करेल...
असं कोणी असेल तर किती बरे होईल...

पण... नाहीये कोणी म्हणून काही बिघडतं नाही...
प्रत्येकाला कोणीतरी हवंच अशातलाही भाग नाही...
माझं...जीवन हे एक न सुटणारे कोडे आहे ...
आणि माझा जन्म हे माझ्यासाठी प्रश्नचिन्हं आहे...
जस आहे तसं जगायचं,स्वताचे दुःख विसरून दुसऱ्यांना हसवायचं...
आणि हसता हसता डोळ्यात पाणी आले तरं,
आनंदाश्रू  सांगून रडून घायंच...

Offline Deepak Pardhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 162
 • Gender: Male
 • Deepak Pardhe
Re: प्रेमाच्या शोधात . . .
« Reply #9 on: April 27, 2012, 03:56:04 PM »

Very Nice Post renu... may i know the author name... really awesome....

some massage from my side . . .

आपल्याला साथ देणारे कित्येक भेटतात,
पण सगळ्यांची साथ शेवट पर्यंत लाभते असे नाही . . .
आणि हो, मन हे एक पाखरू असते, त्याने कितीही उंच झेप घेतली तरी,
त्याला विसाव्याला झाडाची फांदीच लागते . . .
म्हणून माणसाने स्वताचे आयुष्य मीठाप्रमाणे बनवावे . . .
ते कितीही खारट असले तरी ते दुसऱ्याच्या आयुष्यात वेगळीच चव आणणारे असावे . . .
जोडीदाराची गरज प्रत्येकालाच असते . . . पण कोणाला आपली गरज आहे हे नेहमी पाहावे . . . 

- दीपक पारधे