Author Topic: अनामिका  (Read 864 times)

Offline vaibhav joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
अनामिका
« on: April 27, 2012, 12:03:04 PM »


माझ्या मनातील प्रिय अनामिका...

कोण आहेस कशी आहेस ठाऊक नाही,

पण तू आहेस हे मात्रं खरं!

तुला कुठलाच नाव देववत नाही...

कशी असशील तू? कल्पनाही करवत नाही ...   

पण तू आहेस हे मात्रं खरं!

जशी असशील तशीच राहा

मला तुझ्यात अन तुला माझ्यात पहा

पाहायला तू कुठे असशील माहित नाही

पण तू आहेस हे मात्रं खरं!

खूप वाटतं तुला शोधावं, शोधून तुला भेटावं

सहज सुंदर अशा भेटीत, 'हे आपलं माणूस' असं तुलाही वाटावं

कुठे आहेस तू? कुठे शोधू तुला? काहीच कळत नाही,

पण तू आहेस हे मात्रं खरं!

अन तू खरच असशील ना,

तर साद घाल 'अगदी आतून'

मी असेनच तुझ्या प्रतीक्षेत,

वाट बघत तुझी डोळ्यात जीव ओतून!

--- वैभव वसंत जोशी, अकोला     

Marathi Kavita : मराठी कविता