Author Topic: काल आलेला पाऊस ..  (Read 998 times)

काल आलेला पाऊस ..
« on: April 27, 2012, 04:23:33 PM »
काल आलेला पाऊस जरा जोरातच पडला होता
फुटलेल्या त्या छपरातून तो माझ्यावरही पडला होता
भिजलो मी थेंबाने तुझी आठवण त्याने काढली
बघ म्हणतो तिच्या आठवणीत अजून ओलीच आहे तुझी पापणी

घेऊन आलो निरोप मी तिला हि भेटून आलो
सुखात आहे रे ती तुला दुखत सोडून
तिनेच मला तुझ्यावर जोरात बरसायला सांगितलं

बरस म्हणते जोरात जोवर विसरत नाही तू
जगतो तुझा आहे म्हणून जळते आहे ती

मी ही वेडाच जो तुझ्यावर बरसतो आहे
खरे सांगतो तुला मीही तिच्यासाठीच बरसतो आहे

पावसाला हि आवरले नाही माझी दशा पाहून
पाहणारच नव्हतो उद्या त्याचे मुसळधार होणे गेले अधुरे राहून ...
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º
« Last Edit: April 27, 2012, 04:23:49 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता