Author Topic: प्रेम.........प्रेम.............प्रेम.........  (Read 3048 times)

Offline ishudas

 • Newbie
 • *
 • Posts: 2
या जगात.....
प्रेम करणाऱ्यांची इतकी आहे संख्या...
तरी अजून कळली नाही कोणाला
... खऱ्या प्रेमाची व्याख्या.....

कोणी म्हणे.....
प्रेमात नेहमी जीव अस्वस्त राहतो....
"ती" जवळ नसली कि जीव कसा जाऊ पाहतो....

नकारात प्रेम असतं.....
होकारात प्रेम असतं.....
काळजातल्या काळजीच्या
विचारात प्रेम असतं....

कोणी म्हणे.....
“प्रेम असतं परिवर्तनात.......”
कोणी म्हणे........
“प्रेम असतं फक्त 'तिच्या' आनंदात.....”

हक्काने भांडण्यात प्रेम असतं....
एक-मेकांचे विचार मांडण्यात प्रेम असतं....
एक-मेकांच्या दुखः प्रसंगी....
डोळ्यातून अश्रू सांडण्यात प्रेम असतं....

कोणी म्हणे....
"लैला-मजनूचं प्रेमच खंर....”
कोणी म्हणे.....
“प्रेमापासून दूर राहिलेलच बंर.....”

एक-मेकांचे दुखः वाटण्यात प्रेम असतं....
“तिच्यासाठी” नेहमी झटण्यात प्रेम असतं....
पण तिच्या मनाविरुद्ध काहीही होऊ नये म्हणून....
तिच्या जीवनातून हटण्यातही प्रेम असतं......

तसं मी पण प्रेम करतो "तिच्यावर”....
पण होत नाही सांगायची हिम्मत....
काय करू "तिला" सांगून माझ्या भावना......
प्रेम म्हणजे वाटते "तिला" गम्मत.....

काय करू नेमकं.......
नाही समजत काही ......
म्हणून तर "Valentine Day" ला.....
मी काहीही करत नाही.....
------------------------------------------------ईश्वर चौधरी  (इशुदास)
« Last Edit: April 27, 2012, 10:16:34 PM by ishudas »

Marathi Kavita : मराठी कविता


Aparna patil

 • Guest
Premat padlyashivay prem kalat nasat..........
tumach ani amch saryanch same asat.......


Offline महेश मनोहर कोरे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 158
 • Gender: Male
 • अवघड प्रेमाच्या कळ्या फुलतात मग माणुसकीच काय ?
Love is  Undefined creature........... :)

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
nice... i like it very much... keep writing n keep posting :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):