Author Topic: ती म्हणायची लाईफ पार्टनर बोल  (Read 1655 times)

Offline Mahesh parge( Mohi Raj )

  • Newbie
  • *
  • Posts: 36
ती म्हणायची लाईफ पार्टनर
बोल
गर्ल फ्रेंड नकोरे बोलत जावू
मला नाही पटत.

कारण तुझी लाईफ पार्टनर
बनुन राहायचेय तुझ्या
तुझ्य सोबत सतत.

गर्ल फ्रेंड हा चार
दिवसांचा खेळ असतो.
लाईफ पार्टनर मात्र दोन
जिवांचा मेळ असतो.

लाईफ पार्टनर बनुन
तुझ्यशी गाठ बांधायचीय.
तुझ्या प्रत्येक सुख दुःखात
तुला साथ द्यायची आहे.

तीचे हे असे माझ्या
प्रेमा बद्दल बोलणे
आणि मला मात्र पुर्ण
भारावुनच सोडणे.

कधी वीचारही केला
नव्हता ती शेवटी माझी
गर्ल फ्रेंड ठरेल.

चार दिवसांची सोबत
देउन मला एकट्याला
जीवणाच्या
वाटेवर सोडेल...
                  Mahesh Parge( Mohi Raj ), ICL Vashi.
« Last Edit: April 29, 2012, 09:03:31 AM by Mahesh parge( Mohi Raj ) »