Author Topic: एका चिल्लर क्षणी ती आपल्या प्रेमात पडते ...  (Read 1657 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
एका चिल्लर क्षणी
ती आपल्या प्रेमात पडते ...
एका चिल्लर क्षणी
सगळं मनासारखं होत जातं..!
आपल्याला आवाज नाही आला तरी ..
आपली चिल्लरगिरी सगळीकडे खूळखुळते ..!!

नंतर ..
काही बंदे रुपये..
आपण वाजवत फिरत असतो..
दुकानात , मॉल मध्ये ..
आवाज आला नाही तरी ..

अन उरलेली चिल्लर
देवळांत भिका-या समोर
आवाजासकट फेकून
दानशूर होत असतो आपण ..

अन एका चिल्लर क्षणी
लग्नाचे काही फोटो बघताना ..
तिचं खोटं खूळखूळणार हास्य बघून ..
तिच्या नव-यासमोर ..
मला दानशूर झाल्यासारखं वाटतं !!
बिना आवाजाचं!!

-- विनायक
१२ जून २०११

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
kya bbat hai.... mast kavita.