Author Topic: माझ्या स्वप्नातील तू  (Read 3941 times)

Offline salunke.monika

 • Newbie
 • *
 • Posts: 38
माझ्या स्वप्नातील तू
« on: June 05, 2012, 03:22:36 PM »
रोजच माझे एक स्वप्न असते
त्या स्वप्नात मी तुलाच पाहते
असेल ते इतरांना साधारण जरी
तरी मला ते स्वप्नसुखच भावते

न माहित कोण , कसा आहेस तू?
कि माझ्या मनातील पुसटशी प्रतिमाच तू
तुझ्या विचारांत गुंग मी होते
माझ्या हृदयातील स्पंदनेच तू

विचार येता मनी कसा असशील तू
तेव्हाच चेहऱ्यावर माझ्या लाली येते हळू
तुझ्या स्वप्नात रंगुनी जाते रे मी
सख्या रे कधी स्वप्न हे सत्यात आणशील तू

तू असा तू तसा खूप स्वप्ने  रंगविली रे
प्रत्येक रंगात तुला नव्याने पाहिले आहे
रंगांना माझ्या एक नवी चमक देशील ना रे
तुझ्या येण्याचीच वाट मी पाहत आहे

माझ्या स्वप्नांचा आधार आहेस रे तू
या स्वप्नांना तुझी साथ दे ना रे तू
तुझ्या आयुष्याची  सोबती व्हायचंय रे मला
तुझी जीवनसंगिनी मला करशील ना तू

तुझ्यातच माझे जग एकवटायचंय रे मला
तुझ्यावर जीवापाड प्रेम करायचं मला
तुझ्या नावाने जगात वावरायचंय रे मला
तुझ्यातच माझे स्वप्न संपवायचंय मला
 
स्वप्न एवढेच आहे रे माझे
तू भेटावास हि एकाच आस आहे
माझ्यासाठी हि तू स्वप्न पाहशील ना रे?
तू पण माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ना रे?
                                                        ( मोनिका )

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझ्या स्वप्नातील तू
« Reply #1 on: June 06, 2012, 10:21:56 AM »
milel.... swapnatla rajkumar lavkarch milel.... all the best..
 
kavita chan aahe. :)

Suparna S. A.

 • Guest
Re: माझ्या स्वप्नातील तू
« Reply #2 on: June 06, 2012, 03:30:24 PM »
Khupch sundar kavita aahe tuzi Monica.... ekdum mazya manatil aahe.... thxxxx.... ashacha kavita post karat ja...
 :)

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: माझ्या स्वप्नातील तू
« Reply #3 on: June 07, 2012, 01:41:30 PM »
Wow Khup Sunder Kavita keli aahe aani very soon you will get your prince charming dear :)

viddyasagar

 • Guest
Re: माझ्या स्वप्नातील तू
« Reply #4 on: July 29, 2012, 02:39:07 AM »
khupach sundar kavita aahe... monika ji