Author Topic: मी आणि माझा एकांत.  (Read 2696 times)

Offline प्रसाद पासे

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
  • कवितेतून स्वतःला समजायला लागलो..
मी आणि माझा एकांत.
« on: June 15, 2012, 12:39:02 PM »
जावेद अख्तर यांच्या एका कवितेचं भाषांतर:-
(हि कविता सिलसिला ह्या सिनेमातील आहे)

मी आणि माझा एकांत नेहमीच ह्या गप्पा करतो
तू असतीस तर कसं असतं
तू हे बोलशील तू ते बोलशील
तू ह्या गोष्टीवर चिडशील
तू त्या गोष्टीवर हसशील
तू असतीस तर असं असतं, तू असतीस तर तसं असतं

 
हि रात्र आहे की तुझे केस विखुरलेले आहेत
आहे चांदणं, की तुझ्या नजरेने माझ्या रात्री साफ आहेत
हा चंद्र आहे, की तुझं कंकण
तारे आहे, की तुझा पदर
हवेची झुळूक आहे, की तुझ्या शरीराचा सुवास
हि पत्त्यांची आहे सळसळ, की तू हळूच काही बोलली आहेस
हा विचार करतो, मी कधी शांत शांत
की मलाही पण हे माहिती आहे, की तू नाही आहेस, कुठेच नाही आहेस
पण हे हृदय आहे की म्हणतं आहे, तू इथेच आहेस, इथेच कुठे आहेस

 
असाह्य ही अवस्था, इथे पण आहे, तिथे पण
एकटेपणाची एक रात्र, इथे पण आहे, तिथे पण
बोलायचं खूप काही आहे पण कोणाला सांगायचं आपण
किती असं शांत राहायचं आणि सहन करायचं आपण
हृदय म्हणतं आहे जगाची प्रत्येक रीत तोडून टाकू
तुझ्या माझ्या मध्ये जी भिंत आहे ती तोडून टाकू
का मन जाळायचं आपण?, लोकांना सांगून टाकू
हो आम्ही प्रेम केलं, प्रेम केलं, प्रेम
आता हृदयात ही गोष्ट इथे पण आहे, तिथे पण

प्रसाद पासे

Marathi Kavita : मराठी कविता