Author Topic: आहे बरेच काही सांगायला मला  (Read 2393 times)

Offline darshanamahesh

  • Newbie
  • *
  • Posts: 5
आहे बरेच काही सांगायला मला
 
 आहे बरेच काही सांगायला मला
 काळीज ठेव तूही ऐकायला मला!
 
 ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
 (झाला उशीर थोडा वाचायला मला)
 
 असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
 जावे कुण्या दिशेने शोधायला मला?
 
 का रात्र मी अमेची जागून काढली?
 येणार चंद्र नव्हता भेटायला मला
 
 भेटायला हवे ते, का भेटले कधी?
 आले नको नको ते बिलगायला मला!
 
 हलकेच हात मीही हातात घेतला
 होतेच शब्द कोठे बोलायला मला?