Author Topic: तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात खुलताना..  (Read 5380 times)

Offline ShwetaPimprikar

 • Newbie
 • *
 • Posts: 3
तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात खुलताना, जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

सकाळचा नाश्ता करताना असो किंवा संध्याकाळचा चहा पिताना..
drive करत्ताना असो किंवा मी meeting मध्ये असताना..
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

येतोस तू हळूच आणि शिरतोस माझ्या मनात.. नाही कळत तुला आता वेळ कुठली आणि आत्ता महत्वाचे काय..
घेरतोस मला तुझ्या धुंद मिठीत.. आणि होते सगळे अवघड स्वताला सावरताना..
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

तू असलास कि उरत नाहीत कुठल्याच अडचणी.. सगळी संकटे जातात पळून..
घेते मी ओढून बेभान आशेच्या पंखांना..
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

तुझ्या प्रेमाच्या पाकळ्या मनात खुलताना, जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

                                                                                       - निलेशची श्वेता.
« Last Edit: June 19, 2012, 10:22:34 AM by ShwetaPimprikar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
 :)  Nilesh sathi chan kavita lihili aahet....
« Last Edit: June 19, 2012, 10:06:36 AM by केदार मेहेंदळे »

Offline ankush.sonavane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male

Govind MORE

 • Guest

Shweta Nilesh

 • Guest
Happy Diwali
« Reply #4 on: November 10, 2012, 06:11:33 AM »
गेले pumkins आणि सजली रांगोळी ..

गेला halloween आणि आली दिवाळी ..

केले होते trick रावणाने रामाला

पळविली सीता आणि म्हणाला कर सामना माझा ..

दिली त्याला रामाने चांगलीच treat .. केला  त्याचा वध

पेटविली लंका आणि आणली सीता परत ..

दिव्यांचा म्हणतात हाच तो सण

फराळाची मजा आणि आनंदाची उधळण ..

या दिवाळीला होवो पूर्ण सर्व तुमच्या इच्छा ..

होऊदे भरभराट आणि मिळू दे  सुख समृद्धी ...

तुम्हा सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेछ्या ..


- निलेशची श्वेता

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
तू असलास कि उरत नाहीत कुठल्याच अडचणी.. सगळी संकटे जातात पळून..
घेते मी ओढून बेभान आशेच्या पंखांना..
जग विसरते मी फक्त तुझाच विचार करताना..

छान कविता आहे :) :) :)