Author Topic: तू आली आयुष्यात  (Read 1778 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तू आली आयुष्यात
« on: August 02, 2012, 08:06:10 PM »
तू आली आयुष्यात
मन रवीच झालं
मलाही कळलं नाही   
कधी कवीच झालं
दिवसाढवळ्या तुझं
स्वप्न पाहू लागलं
रात्रीही तुला स्वप्नात
घेऊन  फिरू  लागलं
एकट असतांनाही
वेड्यासारखं हसू लागलं
बेधुंद आयुष्य
मन जगू लागलं
केव्हाही उमलून शब्द
कविता करायला लागलं
त्या शब्दाशब्दात
तुला भेटू लागलं .
« Last Edit: August 11, 2012, 10:12:50 PM by SANJAY M NIKUMBH »

Marathi Kavita : मराठी कविता