Author Topic: वेड लागलंय मला  (Read 1579 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
वेड लागलंय मला
« on: August 05, 2012, 05:58:26 PM »
सपाटून मार खाणार आहे
असं वाटायला लागलंय
रस्त्यावर चालायलाही
मन घाबरायला  लागलंय
प्रत्येक चेहऱ्यात मन
तुला पाहू  लागलंय
इतकं तुझं वेड
प्रिये मला लागलंय
असं काय सख्या
माझ्या चेहऱ्यात दडलंय
तुझ्या अंतर्मनातल सौंदर्य
चेहऱ्यावर पसरलंय
तुझं मनच इतकं सुंदर
त्यावरच मन भाळलय
वेड लागण्याच गुपित
त्यातच तर दडलंय .

Marathi Kavita : मराठी कविता