Author Topic: तुझं हसणं  (Read 13318 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
तुझं हसणं
« on: August 05, 2012, 06:44:54 PM »
तुझं हसणं
तुझं हसणं ...... नभात चांदणं उमलवत
तुझं हसणं ...... दवबिंदूंनी अंगण सजवत   
तुझं हसणं ...... कळीलाही हसणं शिकवत
तुझं हसणं ...... फुलालाही गंध पुरवत 
तुझं हसणं ...... वाऱ्यालाही झुलायला लावत 
तुझं हसणं ...... पानांनाही डोलायला लावत
तुझं हसणं ...... सूर होऊन बेभान करत 
तुझं हसणं ...... कोकिळेचं भान हरवत
तुझं हसणं ...... माझा पाठलाग करत
तुझं हसणं ...... माझ्या मनास गुंतवत
तुझं हसणं ...... इंद्रधनुचे रंग लेवून येत
तुझं हसणं ...... तुझ्या रंगात रंगवून टाकत
तुझं हसणं ...... येतांना वसंत घेवून येत
तुझं हसणं ...... जातांना तो गंध ठेवून जात
तुझं हसणं ...... मनी प्रीतीचे तरंग उठवत
तुझं हसणं ...... मनास वेड लावत
      सारा आसमंत फिदा झालाय
      प्रिये तुझ्या हसण्यावर
      कळलं असेलं तुलाही
      मी कां भाळलो तुझ्यावर 
« Last Edit: August 05, 2012, 06:54:27 PM by sanjay333 »

Marathi Kavita : मराठी कविता

तुझं हसणं
« on: August 05, 2012, 06:44:54 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

SATISH LAXMAN GAVHALE

 • Guest
Re: तुझं हसणं
« Reply #1 on: August 05, 2012, 07:18:17 PM »
प्रेम कसः असत....
प्रेम कसः असत....
नेहमीच विचायचीस मला तू
कधीतरी मलाही सुगंध दे
नेहमीच सांगायचीस तू

गुलाबाला काटे होते
आणि डोळ्यात पाणी
रात्र रात्र जागवलेली
दोघांनी पाहिली स्वप्नः आपली
सोडून मोकळे केस
बाहूत माझ्या
प्रेम कसः असत
तरी मला विचारात होतीस तू

काय सांगू कस सांगू
ओठावर टेकवले ओठ
श्वासात अडकला श्वास
थरथरणारी तुझी काया
सर्व कस शांत निश्चल
बोलत होती गात्र सारी
प्रेम कसः असत....
तरी विचारात होतीस मला तू.    – सतीश लक्ष्मण गव्हाळेSATISH LAXMAN GAVHALE

 • Guest
Re: तुझं हसणं
« Reply #2 on: August 05, 2012, 07:21:03 PM »
आर पार
प्रत्येक वळणावर रस्ता
एक प्रश्न विचारात होता
मिटवून जुन्या पाऊलखुणा
पुढे जाण्यास खुणावत होता


प्रत्येक रात्रीनंतर
सुर्योदय ठरलेलाच होता
खोल अंधाऱ्या रात्रीतच
उषःकाल लपला होता

येणारे प्रत्येक दुःख
फक्त आशेचे किरण होते
भावी सुखाच्या प्रतीक्षेत
स्वागताला दारी उभे होते

प्रत्येक अस्तित्वाला
एक आर पार होता
मध्य शोधता शोधता
खेळ
जीवन मृत्यूचा रंगला होता.   – सतीश लक्ष्मण गव्हाळे
SATISH LAXMAN GAVHALE

 • Guest
Re: तुझं हसणं
« Reply #3 on: August 05, 2012, 07:22:43 PM »
काच
काचेच्या वस्तू तुला
आवडतात माहित होत मला
तुकडे करण्यासाठीच
हृदयाशी माझ्या
का खेळायच होत तुला.   – सतीश लक्ष्मण गव्हाळे

supriya virkude

 • Guest
Re: तुझं हसणं
« Reply #4 on: August 06, 2012, 01:03:06 PM »
 :) :) :) :) khup chan kavita aahe. tu jichya sathi keliye ti kharach khup lucky aahe.sooooooooooooooo niceeee

tanmay6767

 • Guest
Re: तुझं हसणं
« Reply #5 on: August 09, 2012, 06:04:17 PM »
MASTTTTTTTTT

rajendra nikam

 • Guest
Re: तुझं हसणं
« Reply #6 on: August 10, 2012, 03:12:26 AM »
1kch no,

suhas768676

 • Guest
Re: तुझं हसणं
« Reply #7 on: August 12, 2012, 02:42:07 PM »
EKDAM ZAKAS

bablu45

 • Guest
Re: तुझं हसणं
« Reply #8 on: August 14, 2012, 08:34:19 PM »
chan

prateeksha

 • Guest
Re: तुझं हसणं
« Reply #9 on: August 15, 2012, 10:32:10 PM »
khupach mast ahe. apratim

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):