Author Topic: तू आहेस माझ्या सोबत  (Read 2145 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तू आहेस माझ्या सोबत
« on: August 07, 2012, 09:56:01 PM »
तुझा चेहरा मी
हृदयात ठेवून घेतलाय
माझ्या नसानसात
तो साठवून घेतलाय
उगीच नाही रस्त्यावर
मी एकटा हसत
चालता चालता तुलाच
मी असतो बघत
लोकांना उगीच वाटत
माझे ओठ कसे हलतात
मी एकटा असूनही
ते कुणाशी बोलतात
फक्त मला माहित असत
तू आहेस माझ्या सोबत
कुणालाही कशी कळेल
हि प्रेमाची रंगत .


« Last Edit: August 08, 2012, 08:05:09 PM by SANJAY M NIKUMBH »

Marathi Kavita : मराठी कविता